सर्वसामान्यांना दिलासा देणारी इलेक्ट्रिक हातगाडी
*मंत्री भरत गोगावले यांचा विश्वास*
*पाच लाभार्थ्यांना क्रांती चौकात इलेक्ट्रिक हातगाड्यांचे वितरण*
*छत्रपती संभाजीनगर | दि. १७ :* देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी गोर गरीब हातगाडी चालकांना भारत वीर इलेक्ट्रिक गाड्यांचे वितरण होत आहे. ही सर्वसामान्यांना दिलासा देणारी मोठी गोष्ट आहे असा विश्वास राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खार भूमी मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला. क्रांती चौकात गुरुवारी (दि. १७) वाय. बी.पाच फाउंडेशन च्या vati प्रतिनिधिक लाभार्थ्यांना इलेक्ट्रिक हातगाड्यांचे वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघांचे खासदार संदीपान भुमरे, श्री क्षेत्र पैठण विधानसभा मतदार संघांचे आमदार विलास संदीपान भुमरे, वाय.बी फाउंडेशन चे योगेश भूतडा, युवा सेना शहर प्रमुख ज्योतीराम पाटील,भारत वीर इलेक्ट्रिक चे ऋषिकेश जोशी, सचिन मुळक, रिपाईचे मराठावाडा कुंदन लाटे, किशोर पवार, आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना मंत्री गोगावले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला येत्या काळात ७५ गावे सक्षम करायचे आहे. शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जर आपल्याला पोहचायचे असेल तर रोजगार हमी योजनेतून आपल्याला कामे करावी लागतील. हे खाते अगोदर संदीपान भुमरे यांच्याकडे होते आणि त्यांनी केलेले तेच काम आम्ही पुढे नेत आहोत. आपल्या या महाराष्ट्रासाठी जे जे काही करता येईल ते ते आपण करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलतांना केले.
*पाच लाभार्थ्यांना करण्यात आले इलेक्ट्रिक हातगाड्यांचे वितरण*
रघुनाथ शिंदे, उषा काळे, रामभाऊ चौधरी, रमेश आगळे, रमेश बेदरे यांना या इलेक्ट्रिक हातगाड्यांचे प्रतिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.
*शासन, बँकानी अर्थसहाय्य करावे...*
दुचाकी किंवा इतर वाहनांना जसे विविध बँका कडून किंवा शासनाकडून अर्थसहाय्य, सबसिडी दिल्या जाते त्याच प्रमाणे या इलेक्ट्रिक हातगाडी चालकांनाही अर्थ सहाय्य करावे अशी अपेक्षा इलेक्ट्रिक हातगाडी चे अविष्कार करणारे अभियंता सुयोग चांडक यांनी केले आहे.