सिध्देश्वर मठपती
प्रेस रिपोर्टर नांदेड
धर्माबाद तालुक्यातील समराळा हयेथे दिनांक १५ ऑगस्ट ७९ स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
समराळा हा धर्माबाद तालुक्यात आदर्श गाव म्हणून ओळखिला जातो.गावातील सर्व नागरिक एक मताने एकजुटीने एकत्र राहतात.समस्त गावकऱ्यांच्या वतीने सर्वानुमते महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी नागनाथ सिद्धअप्पा मठपती यांची नियुक्ती तर उपाध्यक्षपदी माधवराव शिवराम पाटील हाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गावामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेकांनी आतापर्यंत योगदान दिले. हाच वारसा पुढे नेत गावामध्ये शांतता सुव्यवस्था राखण्याचे कार्य आम्ही करू असे नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी आश्वासन दिले.
या वेळी उपस्थित ग्रामसेवक आंबेराव साहेब,सरपंच बाबुराव पाटील रायकोडे,उपसरपंच नरसैया एनलोड, चेरमन दत्तात्रेय एनलोड,दतराम पाटील जेरमोड, विक्की अबुलकोड,लक्ष्मण वडनवार,रामजी इप्तेकर, तुकाराम जाजेवार,सुरेश हाळे,दत्ता जाजेवार,शंकर इपतेकर,विनोद केरोळे,नागेश वनीकर,बालाजी, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अंगणवाडीतील शिक्षक सेविका व गावातील सर्व नागरिकांच्या वतीने तंटामुक्त अध्यक्षपदी नागनाथ मठपती महाराज व उपाध्यक्षपदी माधवराव पाटील हाळे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी समराळा गावातील नागरिकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.