औरंगाबाद तालुक्यातील सावंगी ग्रामपंचायत वर यावेळी सरपंच व सदस्य यांनी ध्वजारोहण न करता देशासाठी सीमेवर लढलेले कर्नल मन्सूर अली खान
यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर देश सेवा करत विरगती ला प्राप्त झालेले शहीद जवान कडूबा बनसोड च्या विरपत्नी चंद्रभागाबाई कडूबा बनसोड यांच्या हस्ते सावंगी येथील विविध कार्यकारी सोसायटी कार्यालयावर ध्वजारोहण करण्यात आले,यावेळी ग्रामपंचायत व किंग कमांडो अकॅडमी तर्फे कर्नल मन्सूर अली खान व विरपत्नी
चंद्रभागाबाई बनसोड यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत तर्फे जिल्हा परिषद शाळेतील दिडशे मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमासाठी
सरपंच कदीर शेख,उपसरपंच दामोदर भालेराव,प्रदीप दहीहंडे, अफजल शहा,दादासाहेब म्हस्के,विश्वास जगदाळे,संजय जगदाळे,राजेंद्र जगदाळे,अनिल जगदाळे,विनोद वाघ,सय्यद समीर,रमेश लेभे,चंदन घाडगे,दिलदार शेख,शेख अहेमद,शेख सलीम,कैलाश जगदळे, सय्यद कदीर,यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती