भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाचे उपसचिव डॉ.अभिषेक कुमार साहेब हे 2 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुग्ध सहकारी संस्था व मत्स्य सहकारी संस्था यांच्या कामकाज व अडचणी याचा आढावा घेण्यासाठी आले असता औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक सभागृहात त्यांचा नेवपूर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या वतीने चेअरमन श्री. तुकाराम वानखेडे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व सहकार क्षेत्रात मत्स्य व्यवसाय संबंधित केलेल्या कामा आढावा व मत्स्य सभासदांच्या अडचणी व संस्थे पुढीलआव्हाने याबाबत मा.उपसचिव साहेबांशी चर्चा केली आणि त्या बाबत चे माहिती पुस्तक सादर केले. मच्छिमारांना येणाऱ्या विविध अडचणी साहेबांना सांगितल्या. यावेळी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन श्री. अर्जुन गाढे साहेब, उपाध्यक्ष श्री. डोणगावकर साहेब, छत्रपती संभाजीनगर च्या सहाय्यक निबंधक (दुग्ध) डॉ. आम्रपाली काशीकर मॅडम, सहकार अधिकारी श्रेणी 2 श्री. सचिन जाधव साहेब,शिवणा टाकळी तलावाचे चेअरमन श्री.पन्नालाल बिरोटे व सर्व सहकार क्षेत्राचे संबंधित कार्याल्याचे अधिकारी कर्मचारी बांधव उपस्थित होते.
भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाचे उपसचिव डॉ.अभिषेक कुमार साहेब हे 2 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुग्ध सहकारी संस्था व मत्स्य सहकारी संस्था यांच्या कामकाज व अडचणी याचा आढावा घेण्यासाठी आले.
