हिंगोली जिल्ह्यात मृग नक्षत्रात पाऊसाळ्याच्या सुरवातीपासुनच मुसळधार पाऊस पडत असुन नदी नाले तुडुंब भरून वाहत असुन हिंगोली जिल्ह्यातील सर्व धरण शंभर टक्के भरले असुन धरणांचे पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने अनेकवेळा नदीकाठच्या गावांचा संपर्क तटला होता सतत पडत असलेल्या पावसामुळे पिकांची वाढ खुटली असुन पिकांवर विवीध प्रकारचे रोग उद्भवत असुन पिकं पाण्याखाली गेले असुन हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी कळमनुरी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई येथे निवेदन देत केली आहे.
हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, आमदार संतोष बांगर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देत केली मागणी
