भारतीय स्वतंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे .दिनांक 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहणाऱ्या स्वराज्य महोत्सव उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम विविध पातळीवर आयोजित करणे अपेक्षित आहे. राज्यातील या उपक्रमांतर्गत विविध पातळीवर कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे ,त्या अनुषंगाने नऊ ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये राज्यात स्वराज्य महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आले. या महोत्सवाअंतर्गत राज्यस्तर जिल्हास्तर तालुकास्तर व ग्रामस्थरावर आयोजित करावयाच्या कार्यक्रम व उपक्रम अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन या उपक्रमाचा आज 17 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळा माळेगाव न.की. येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच सौ सरपंच नम्रताताई घुगे, उपसरपंच अर्जुन ससाणे, ग्रा.प.सचिव देवराव बेले, शिक्षक काळे सर,कराळे सर, पो.पा.राजेंद्र घुगे ,डॉ.शाशिन घुगे, ग्रां प कर्मचारी सागर मुंढे,ग्रा प ऑपरेटर सौ.जयश्री आठवले ,प्रशांत आठवले,सुनीता करवते (आशाताई), अंगणवाडी सेविका सुमनताई ससाणे, प्रकाश आठवले, गोकुळ आठवले, इत्यादी गावकरी उपस्थित होते.