वैजापूर :-
या वर्षीच्या शैक्षणिक वर्षाचे घोष वाक्य व उद्धिष्ट आहे,"शैक्षणिक गुणवत्ता समृद्धी विकास" हे उद्धिष्ट तळागाळातील विद्यार्थ्यांना ,गोर,गरीब, विद्यार्थ्यांना गाठता यावे म्हणून नगरसेविका डॉ,प्रिती परेश भोपळे व डॉ,परेश भोपळे यांनी तळागाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम येथील श्री स्वामी समर्थ विद्यलयात नुकताच आयोजीत केला होता , आ, रमेश पा,बोरणारे, नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, डॉ,दिनेश परदेशी,नगरसेवक शैलेश चव्हाण,बबन त्रिभुवन, बाबासाहेब जगताप, मुख्याधिकारी भागवत बिघोत, माजी
शिक्षणाधिकारी धोंडिरामसिंह राजपूत, शालेय समितीअध्यक्ष राजेंद्र साळुंके, वसंतराव साळुंके,परसराम आलूले,अण्णासाहेब शेळके यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप झाले,या प्रसंगी शाळा सुशोभीकरण व रंगमंच उदघाटन ही झाले,राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती धारक पात्र विद्यार्थ्यांनी भाग्यश्री साळुंके व भावना चव्हाण यांना ही प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.
सुत्रसंचलन डी,डी, ठाकूर यांनी केले या प्रसंगी मुख्याधपक राजेश वसावे, धनश्याम वाणी, राजेंद्र पाटील, रामकीसन जोरे, एम ,आर गणवीर,बाबूराव वाणी , यांची उपस्थिती होती.