केंद्र सरकारच्या माध्यमातून डाक विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या डाक विभागातील सर्व योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा असे प्रतिपादन भारतीय डाक विभागा तर्फे भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम प्रसंगी प्रवर डाक अधीक्षक संजय आखाडे यांनी केलेआहे.

स्वांतात्र्याचा अमृत महोत्सव डाक विभागाच्या विभागीय कार्यालय अकोला येथे वरिष्ठ अधिक्षक डाकघर येथे संपन्न झाला यावेळी संजय डी. आखाडे, प्रवर् डाक अधिक्षक(भा.डा.से.) यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. डाक विभागा द्वारे ग्राहकांना विविध सेवा पुरविल्या जातात त्या संदर्भात अकोला मुख्य डाकघर येथे गत आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डाक कर्मचाऱ्यांना प्रशस्ती पत्र व प्रोत्साहनपर बक्षीस देवून गौरवान्वित करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून “सर्वोकृष्ट पत्रकार” पुरस्कार प्राप्त श्री किरण अग्रवाल,कार्यकारी संपादक दैनिक लोकमत अकोला हे लाभले होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री संजय डी. आखाडे,(भा.डा.से.) वरिष्ठ अधिक्षक डाकघर अकोला हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुळशीराम बोबडे, ज्येष्ठ साहित्यिक व निवृत्त सहाय्यक पोस्ट मास्तर अकोला यांना साहित्य अकादमी लातूर च्या वतीने नुकताच राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला त्या अनुषंगाने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम किरण अग्रवाल,कार्यकारी संपादक दैनिक लोकमत अकोला, संजय डी. आखाडे,(भा.डा.से.) वरिष्ठ अधिक्षक डाकघर अकोला हरिबाबू वंदना, वरिष्ठ डाकपाल अकोला, सुनील एम. हिवराळे,सहाय्यक डाक अधिक्षक (मुख्यालय)अकोला, एन.एस.बावस्कर सहाय्यक डाक अधिक्षक अकोला मध्य उपविभाग, एस.एस.नानिर, तक्रार निरीक्षक तथा प्रभारी डाक निरीक्षक वाशिम या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. 

विभागातर्फे गत आर्थिक वर्षात PLI, RPLI, POSB खाते, सुकन्या खाते, IPPB नवीन खाते, AePS, CELC, TATA AIG, PMFBY मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 50 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले, ज्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात कार्यरत असलेले शाखाडाकपाल, सहायक शाखाडाकपाल, पोस्टमन, डाक सहायक आणि उपडाकपाल यांचा समावेश होता. पुरस्कार पाप्त कर्मचाऱ्यामध्ये उमर चौधरी, शाकीर अहेमद, श्रीमती राधा बेंगल, संतोष लोखंडे यांना टपाल जीवन विमा मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल,ग्रामीण डाक सेवक जगतराव पुंडकर, सुधीर मेतकर यांना अधिकाधिक बचत बँक खाते उघडणे बाबत, पोस्टमन सोना टिपरकर, गणेश तिखे यांना टाटा ए आय.जी करिता, श्रीमती मीनाक्षी साळुंके, श्री उमेश माहोरे यांना IPPB करिता,श्रीमती सुनिता यादव, नामदेव शिंदे यांना AePS तर प्रशांत नागले , उमेश देशमुख यांना PMFBY(प्रधान मंत्री फसल बीमा योजना) मध्ये उद्दिष्ट पूर्ती बाबत गौरवीण्यात आले. यावेळी प्रभात फेरी काढण्यात आली होती या कार्यक्रमाला डाक विभागातील ग्रामीण डाक सेवकासह बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते

प्रमुख अतिथी श्री किरण अग्रवाल यांनी भारतीय डाक विभागाच्या अविरत सेवेचा गौरव करताना भारतीय डाक विभाग हे सर्व सामान्य नागरिकांना सर्वोत्कृष्ट सेवा देणारे खाते म्हणून उल्लेख केला तर श्री संजय आखाडे यांनी भारतीय डाक विभागाच्या सेवा घराघरात पोहचविण्याचे आवाहन सर्व डाक कर्मचाऱ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री दिपक पाथरकर , कार्यालय सहायक अकोला तर आभार प्रदर्शन श्री नीलकंठ बावस्कर , सहाय्यक अधिक्षक डाकघर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्र गीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या पश्चात अकोला डाक विभागाद्वारे अकोला मुख्य डाकघर ते टावर चौक अकोला दरम्यान ‘प्रभात फेरी’ चे आयोजन करण्यात आले, सदर प्रभात फेरी मध्ये मोठ्या संख्येने डाक विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. प्रभात फेरी मध्ये कर्मचाऱ्यांनी डाक विभागाच्या विविध योजना संबंधीचे फलक प्रदर्शित केले. तसेच डाक विभागाच्या विविध योजनाची माहिती घोषणा देवून जन सामान्यापर्यंत पोहचवली. प्रभात फेरीची सांगता अकोला मुख्य डाकघर येथे झाली.या कार्याक्रमात कर्मचाऱ्यांचा उत्साह अवर्णनीय होता.