शिरुर दिनांक ( वार्ताहर ) कोंबड्या वाहून घेवून जाणा-या टेंपो वर टाकलेल्या दरोडयामधील दोन वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस शिरूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे .प्रदिप उर्फ प्रदयुमन हरीश्चंद्र शिंदे रा. करंजेनगर ता. शिरूर जि पुणे असे आरोपीचे नाव आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर पोलीस ठाणे रेकॉर्डवरील फरारी आरोपीताबाबत पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम घेण्याबाबत आदेश देण्यात आले होते . त्यानुसार शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने शिरूर पोलीस स्टेशन गु रजि नं १४९ / २०२२ भादवी का कलम ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल असलेल्या गुन्हयातील फिर्यादी महंमद आलम अब्रार सिद्धिकी, वय ३२ वर्ष, धंदा - कोंबडया विक्री व्यवसाय, रा. लोकसेवा समिती, इंदिरानगर, आर एस मार्ग मालाड ईस्ट, मुंबई ९७ यांनी फिर्यादी दिली होती की त्यांचा कोंबड्या घेवुन जाणारे टेम्पोवर आरोपी प्रदिप उर्फ प्रदयुमन हरीश्चंद्र शिंदे रा. करंजेनगर ता. शिरूर व त्यांचे इतर ७ साथीदार यांनी दरोडा टाकुन दरोडयामधुन मिळालेल्या कोंबडयांपैकी १२४० कोंबडया के जी एन बॉयलर्स शॉप नं ७, शिरढोण, पनवेल रायगड यांना विक्री करून सदर विकीतुन आलेली ४,१८,३६० रू ही रकमेपैकी २,८८,०००/- रु शिंदे यांनी वाटुन घेतली . या प्रकरणी गुन्हा घडल्यापासुन आरोपी प्रदिप उर्फ प्रदयुमन हरीश्चंद्र शिंदे हा फरार होता. त्याचा शोध घेत असताना त्यास शिरूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने गुप्त माहीतीचे आधारे शिताफीने ताब्यात घेवुन त्यास अटक केली करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक पंकज देशमुख ,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले , पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पो. हवा. परशराम सांगळे, नाथसाहेब जगताप, विनोद मोरे, पोलीस अमंलदार विजय शिंदे, निरज पिसाळ, निखील रावडे, नितेश थोरात, सचिन भोई, रघुनाथ हळणोर, यांचे पोलीस पथकाने केली आहे.

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |