शिरुर दिनांक ( वार्ताहर ) चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग व महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा शिरुर यांच्या सहकार्याने दि.२१ संप्टेंबर २०२४  सकाळी सव्वादहा वाजता महाविद्यालयातील मराठी विभाग (डी-२२) मध्ये ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर (चंद्रपूर) यांचे ' झाडी बोली, साहित्य आणि संस्कृती ' या विषयांवर व्याख्यान होणार असल्याची माहिती मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी दिली आहे . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ . के . सी मोहिते असणार आहेत .उपप्राचार्य एच. एस . जाधव व साहित्य परिषद शाखा शिरुरचे उपाध्यक्ष सतीश धुमाळ प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत . व्याख्यानाला उपस्थित राहण्याचे आवाहन लळीत यांनी केले आहे .