पाटोदा (प्रतिनिधी) बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक आमदार स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांना पाटोदा तालुक्याच्या वतीने सर्वपक्षीय श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी पाटोदा तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अमर रहे,अमर रहे मेटे साहेब अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या, मेटे साहेबांचे पाटोदा तालुक्यावर असणारे प्रेम वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या साहेबांनी मदत केलेले अनेक प्रसंग भावना ऐकताना अनेकवेळा डोळ्यातून आश्रू वाहत होते, मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या बैठकीसाठी जात असताना साहेबांचा दुर्दैवी अपघात होऊन निधन झाले मेटे साहेबांनी मराठा समाजाप्रति केलेले कार्य व त्यांचे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बैठकीसाठी जात असताना झालेले बलिदान चंद्र सूर्य असेपर्यंत न विसरणं आहे ठिक ठिकाणी मेटे साहेबांचे स्मारक करणे हि समाजाची खरी श्रद्धांजली ठरेल व सरकारने मराठा समाजाला आरक्षण देणे म्हणजेच खऱ्या अर्थाने मेटे साहेबांना श्रद्धांजली ठरेल अशा भावना पाटोदा तालुक्यातील सर्वपक्षीय नेते,सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी,डॉक्टर,वकील, शिक्षक,शेतकरी यांनी पाटोदा नगरपंचायत प्राणंगात श्रद्धांजली पर शोकभाषणात वेक्त केले यावेळी सर्वपक्षीय नेते व्यापारी,डॉक्टर,वकील शिक्षक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते