जिल्ह्यातील १६ लाख शेतकऱ्यांनी भरला पिकविमा

बीड  - पिकविमा भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती . मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिकविमा भरला असुन जिल्हाभरातील १६ लाख शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा भरला . जवळपास ६ लाख हेक्टरसाठी शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे . गेल्या काही वर्षापासुन निसर्गाचा समतोल बिघडु लागलाय . कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी होत असल्याने शेती पिकाचं मोठं नुकसान होत असतं . शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने विविध कंपन्यांच्या मार्फत विमा भरून घेतला जातोय . यावर्षी विमा भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती . जिल्ह्यातील १६.४८ लाख शेतकऱ्यांनी ६.२७ लाख हेक्टरसाठी विमा भरला . जिल्ह्यात सोयाबीन , कापुस या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झालेल आहे . या दोन्ही पिकांचा जास्त प्रमाणात विमा भरण्यात आलेला आहे .