हिंगोली  जिल्ह्याच्या शिनगी नागा येथील रहिवासी असलेले शेतकरी नेते मारोती गीते यांच्या विविध मागण्यांना यश आले तसेच शेतकरी व इतरही क्षेत्रामधील नागरिकांना आंदोलन मोर्चा रस्ता रोको यासह विविध उपक्रम राबवून सर्वसामान्य शेतकरी व नागरिक ,विधवा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल, घटकांपर्यंत पोहोचून सर्वसामान्य माणसापर्यंत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न शेतकरी नेते मारोती गीते यांच्या नेतृत्वात होत असल्याचे पाहून विष्णू भाऊ कुऱ्हाडे संस्थापक अध्यक्ष यशवंत संघर्ष सेना यांच्या वतीने सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर करून त्यांना सन्मानपत्र देण्याचे आव्हान विष्णू भाऊ कुऱ्हाडे यांच्या वतीने करण्यात आल्याने सर्वच स्तरातून कौतुकाचा अभिनंदनचा वर्षाव शेतकरी नेते मारोती गीते यांच्यावर पंचक्रोशीतून होताना पहावयास मिळत आहे तर सेनगाव शहरातील श्री साई फर्निचर या ठिकाणी शेतकरी नेते मारोती गीते सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांना शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार समारोप करण्यात आला याप्रसंगी माजी नगरसेवक अजय विटकरे, नगरसेवक अमोल भाऊ तिडके ,पत्रकार महादेव हरण, पत्रकार मोहन कांबळे ,सामाजिक कार्यकर्ते मनोज हजारे, सुरेश कांबळे ओम कांबळे पत्रकार केशव अवचार परविन प्रविण कांबळे यासह विविध मान्यवर याप्रसंगी उपस्थित असून शेतकरी नेते मारोती गीते यांचा भव्य सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले आहे