शिरुर दिनांक (वार्ताहर ) दरवर्षी भव्य हलते व पौराणिक देखावे साजरे करण्याची परंपरा असणा-या रसिकभाउ धारीवाल मित्र मंडळाच्या वतीने यंदा ' श्री सदगुरु शंकरमहाराज यांच्या जन्माच्या  ९ मुर्त्यांच्या भव्य देखावा सादर केला आहे . मंडळाचे अध्यक्ष मितेश गादीया असून मार्गदर्शक प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारीवाल आहेत . मंडळाच्या देखवाचे उदघाटन उद्योगपती प्रकाश धारीवाल व शिरुरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन झाले .यावेळी मंडळाचे अध्यक्ष मितेश गादिया,राजु लोळगे,दिलीप करंजुले,सुभाष गांधी, महेश रासने,राजू बच्चूवार,जितेंद्र कोठारी,देवेंद्र फुलपगर,आशिष दुगड, राजेंद्र दुगड,प्रीतेश सुराणा,अशोक दुगड, अमित गादिया,शिरीष गादिया आदी उपस्थित होते.