वाघोली येथे जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी काही कारणांमुळे उपस्थित न राहता आल्यामुळे मुरलीधर मोहोळ यांनी आगामी काळात वाघोलीतील भेटी प्रसंगी आवर्जून भेट देण्याचा शब्द पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष संदीप सातव यांना दिला होता.
जनसेवा कार्यालयास भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधत केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपला शब्द पाळला.
वाघोली व हवेली तालुक्यातील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची भेट केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली. वाघोली आणि पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
वाघोली तालुका हवेली येथील संदीप सातव यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाले होते. काही कारणांमुळे या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना उपस्थित राहता आले नव्हते. मात्र वाघोली मधील कार्यक्रमप्रसंगी वेळात वेळ काढून त्यांनी संदीप सातव आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत आपला शब्द पाळला.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, सोमनाथ सातव, रत्नमाला सातव, गणेश कुटे, प्रदिप सातव, मेघराज कटके, अविनाश सातव, अतुल कड, सरपंच हेमंत सातव, युवराज गायकवाड, अतुल कड, गौरव सातव, अभिजीत सातव आदी मान्यवर उपस्थित होते.