शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर येथील कविश गौरव बाफना या २१ महिन्याचा मुलांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली असून त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तो २१ महिन्याचा असून घोडेस्वारी व योगासने करतो , त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याची माहिती ॲड . गौरव प्रकाश बाफना यांनी दिली आहे . बाफना यांनी सांगितले की कविश हा केवळ 21 महिन्याचा बालक आहे. तो "घोडेस्वारी" करतो. या मुलाचे है धैर्य पाहुन सगळेच अश्चर्य व्यक्त करत आहे. तसेच कविश ला ससे, बकरी, घोडे , सोबत खेळायला आवडते याच बरोबर तो योगासने, ओंकार देखील करतो. त्याचे ह्या कामगिरीची "इंडिया बुक ऑफ रेकोर्ड मध्ये नोंद झाली आहे . माजी नगराध्यक्ष व उद्योगपती प्रकाश रासिकलाल धारीवाल" यांच्या हस्ते कविश यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी प्रकाश चंद्रकांत बाफना , कामिनी बाफना आदी उपस्थित होते . कविश आयुष्यात अनेक मोठ-मोठे रेकॉर्ड बनवेल आणि आपल्या भारताचे नाव उज्वल करेल अशी अपेक्षा व शुभेच्छा त्याला यावेळी देण्यात आल्या .