भेंडाळा फाट्यावर अपघात;दोघे जंण जागीच ठार 

औरंगाबाद;

औरंगाबाद-पुणे महामार्गावरील भेंडाळा फाट्याजवळ ट्रक मोटरसायकलच्या अपघातात दोन विद्यार्थी ठार झाल्याची घटना घडली असुन आदीत्य रामनाथ सुंब (वय 20, रा, मांजरी ता. गंगापूर) आणि यश उर्फ नयन भाऊसाहेब शेंगुळे (वय 20, रा, मांजरी ता. गंगापूर) असे या अपघातात ठार झालेल्या दोन्ही तरुणांचे नाव आहे.

 हैद्राबादला जाणाऱ्या ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत या दोन्ही तरुणांचा जगीच मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अपघात मृत्यू झालेले हे दोन्ही मित्र एकाच गावातील असून, लहानपणीचे वर्गमित्र असल्याचे सुद्धा समोर आले आहे.