औरंगाबाद:- १५ (दीपक परेराव) "देश मेरा रंगीला".नुकतेच 'संत एकनाथ रंगमंदिरात' आंतरशालेय व महाविद्यालयीन देशभक्तीपरगीत व नृत्य स्पर्धेचे उद्घाटन अभिनेत्री अनुष्का सरकटे हीच्या प्रमुख उपस्थितीत व भगवान बाबा अनाथ बालिका आश्रम येथील मुली, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. दिलीप घारे,मा.महापौर नंदकुमार घोडेले, प्रसिद्ध गायक प्रमोद सरकटे, युवा नेते अभिजीतभैय्या देशमुख,सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, प्रसिद्ध शाहीर सुरेश जाधव व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.जेष्ठ रंगकर्मीं डाॅ.दिलीप घारे सर यांच्या हस्ते अनुष्काचा सत्कार करण्यात आला.शालेय मुलांचा भरभरून प्रतिसाद या स्पर्धेस मिळाला. देशभक्तीची बीजं या वयात या मुलांमध्ये ओतप्रोत भरलेली दिसली,त्यांचा जोश व उत्साह वाखाणन्याजोगा होता. हाच उद्याचा उज्ज्वल भारत आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त अर्थातच अमृत महोत्सव वर्षा निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. "युवा मित्र फाउंडेशन", "लाईव्ह महाराष्ट्र", "महानगरपालिका" ,"नेहरू युवा केंद्र भारत सरकार",यांच्या वतीने आयोजित "देश मेरा रंगीला" हा कार्यक्रम...सचिन अंभोरे,देवेन करवडे,व सर्व पदाधिकारी यांनी सुरेख आयोजन केले....तीन तास चाललेल्या या कार्यक्रमास "संत एकनाथ रंगमंदिर" देशभक्तीने ओथंबून वाहत होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
1995માં ભાજપને સત્તા અપાવવામાં મહત્વની ભૂમિકા ભજવનાર આચાર્ય ધર્મેન્દ્ર મહારાજનું નિધન-Prashant Dayal
1995માં ભાજપને સત્તા અપાવવામાં મહત્વની ભૂમિકા ભજવનાર આચાર્ય ધર્મેન્દ્ર મહારાજનું નિધન-Prashant Dayal
2024 के लोकसभा चुनाव परिणाम पर निर्भर करेगा कर्नाटक सरकार का भविष्य: एचडी कुमारस्वामी
बेंगलुरु, कर्नाटक में सिद्दरमैया के नेतृत्व वाली कांग्रेस सरकार के लंबे समय तक चलने पर संदेह...
सेक्युलर पक्षांना मुस्लिम नेता नाही फक्त मुस्लिम कार्यकर्ता पाहिजे - अॅड. शेख शफीक भाऊ
वडवणी तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांची निवड; अनेकांचा पक्ष प्रवेश
वडवणी (प्रतिनिधी) - तालुक्यात एआयएमआयएम पक्षाच्या वडवणी तालुकाध्यक्षपदी अकबर पठाण तर वडवणी...