शिरुर दिनांक (वार्ताहर ) शिरुर शहर परिसरात मोठ्या उत्सहात गणरायाचे आगमन झाले . गणपती बाप्पा मोरयाचा गजर करित घरगुती गणरायाचे घरोघरी आगमन झाले . घरगुती गणेशाची स्थापना सकाळी व दुपारी करण्यात आली तर सार्वजनिक गणेश मंडळानी सायंकाळी गणेशाची प्रतिष्ठापना केली. शहरातील रयत शाळेच्या मैदानावर गणेश मुर्ती व पूजा साहित्य विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते .सकाळ पासूनच भाविकानी या ठिकाणी गणेश मुर्ती घेण्यासाठी आले होते .अनेक जणांनी पारंपारिक वाद्याच्या गजरात श्री गणेशाला घरी नेले . याच परिसरात गणेशाच्या पूजेसाठी लागणा -या साहित्य विक्रीचे दुकाने होते. त्यात पाच फळे ,वस्त्रे ,उदबत्ती व अन्य वस्तु विक्रीची दुकाने होती .यंदाच्या वर्षी गणेश मुर्तीच्या किमंतीत वाढ झाली होती . हलवाई चौक परिसरात मोदक व पेढे व अन्य मिठाई घेण्यासाठी भाविक आले होते . कापड बाजार गणेश मित्र मंडळाच्या गणेशाचे सायंकाळी चारच्या सुमारास ढोल ताश्याचा निनादात आगमन झाले . जय बजरंग गणेश मित्र मंडळ जोशीवाडी येथील श्री गणेशाचे मिरवणूकीने आगमन झाले . शहरातील सार्वजनिक गणेश मंडळानी ज्या मध्ये हलवाई चौक गणेश मित्र मंडळ , आझाद हिंद गणेश मित्र मंडळ सुभाष चौक ,छत्रपती संभाजी गणेश मंडळ हुडको कॉलनी ,आझाद सोशल ॲण्ड स्पोर्टस क्लब लाटेआळी , भाजीबाजार ,सरदार पेठ , आडत बाजार ,राम आळी ,मारुती आळी याठिकाणी सायंकाळी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली . रांजणगाव येथील महागणपती मंदिरात ही महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती गणेशोत्सवा मंदिर परिसरात विद्युत रोषणाई सह फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती . येथील व्हिजन इंटरनॅशनल स्कुल शिरुर मध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला जात असतो . स्कुल ने तुरटीपासुन बनविण्यात आलेली गणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे .संस्थेचे अध्यक्ष विकास पोखरणा यांच्या हस्ते गणेशमुर्तीचे पूजन व आरती करण्यात आली . विकास पोखरणा यांनी सांगितले की पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या भाग म्हणुन येथील व्हीजन इंटरनॅशनल स्कूल शिरुर यांच्या वतीने तुरटीच्या गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असुन पर्यावरण पूरक गणेशोत्सावाचा आधिक प्रसार होण्याचा दृष्टीने समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या पर्यावरण पूरक गणोशोत्सवात सहभाग वाढावावा याकरिता प्रतिष्ठापने करीता पर्यावरण पूरक गणेशमुर्ती देण्यात आल्या आहेत . शिरुर नगरपरिषद कामगार गणेश मित्र मंडळ , शिरुर पोलीस स्टेशन , एचडीएफसी बॅक शाखा शिरुर , शिरुर नगरपरिषद शाळा क्र . -७ आदी सह ४० हून आधीक ठिकाणी या पर्यावरण पूरक गणेश मुर्ती देण्यात आल्या आहेत . सध्या गोल्बल वार्मिग सह हवामान बदलाच्या प्रश्न गंभीर होवू लागला आहे. . विविध प्रकारच्या प्रदूषणाने पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. उद्याच्या पिढीसाठी चांगले पर्यावरण ठेवणे. ही सर्वांची जबाबदारी आहे . मागील तीन वर्षापासुन पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा भाग म्हणून व्हीजन इंटरनॅशनल स्कूल शिरुर मध्ये तुरटी पासून बनविलेली गणेशमुर्ती बसविली जाते .या गणेश मूर्तीचे पाण्यात विसर्जन केल्यावर नदीच्या पाण्याचे प्रदूषण न होता पाणी स्वच्छ होते . पर्यावरण पुरक गणेशोत्सावाचा प्रसार होण्यासाठी व्हीजन इंटरनॅशनल स्कुल शिरुरचा वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना पर्यावरण पूरक गणेश मुर्ती देण्यात आल्या आहेत. आधिकधिक लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन पोखरणा यांनी केले आहे .आपले पर्यावरण वाचविणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी सुवालाल पोखरणा , प्राचार्य पसक्कीन कासी आदी उपस्थित होते .