शिरुर ( वार्ताहर) मातोश्री प्रतिष्ठान आणि एएमएनाईन वृत्तवाहिनी यांच्या वतीने शिरुर शहरासाठी गौरी व गणपती घरगुती सजावट स्पर्धा  -2024 चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती अभिजीत मुकुंद  आंबेकर यांनी दिली आहे .

गणपती सजावट व गौरी सजावटी करीता स्वतंत्रपणे प्रथम क्रमांकास सन्मान चिन्ह व भेटवस्तू ,द्वितीय क्रमांकास - सन्मान चिन्ह व भेटवस्तू व तृतीय क्रमांक - सन्मान चिन्ह व भेटवस्तू ,चतुर्थ क्रमांक - सन्मान चिन्ह व भेटवस्तू असे बक्षिस आहे . सर्व देखावे स्वंत : बनविले पाहिजे. ,एका घरातील एकच व्यक्ती स्पर्धेत सहभाग घेऊ शकतो. सजावट व देखावाचे परीक्षण बुधवार, दि. ११/०९/२०२४ रोजी दु. ३ ते रात्री १० वाजेपर्यंत  केले जाणार आहे . स्पर्धेकरीता नाव नोंदणी दिनांक ५ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर पर्यंत खालील नंबरवर  करावी. नावनोंदणी केलेले नंबरच या स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जातील. अभिजीत आंबेकर - ९८८१६४९९९९ सतिष धुमाळ -९०२८३०१४०० ,शैलेश जाधव - ८४४६३०७६५५  या वरील नंबरवर आपले नाव पत्ता सध्याचा मोबाईल नंबर कुठल्या स्पर्धेत भाग घेतला आहे  हे स्पष्ट नमूद करावे. पावसामुळे जर परीक्षक येऊ शकले नाही तर स्पर्धकांनी आपल्या देखावाचा व्हिडिओ 1 मिनिटाचा वरील नंबरवर पाठवावा असे आंबेकर यांनी सांगितले .