शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहून पिढी घडविण्याच्या करीत असलेल्या कार्याबद्दल गुरुजनांना प्रेरणादायी शिक्षक पुरस्काराने शिक्षक दिनानिमित्त हलवाई चौक गणेश मंडळ शिरुर यांच्या वतीने दिनांक ५ संप्टेंबर २०२४ रोजी सन्मानित करण्यात येणार आहे . यंदाचा वर्षी चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख विद्यावाचस्पती बाळकृष्ण रामचंद्र लळित ,विद्याधाम प्रशाला प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती साहेबराव मुळे , व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचा प्राचार्या पसक्कीन कासी , आरएमडी स्कूल येथील शिक्षिका सुनिता संदिप बिहाणी ओंकार संगीत विद्यालयचे प्रमुख गायक गणेश मराठे यांना सन्मानित करण्यात येणार आहे . ५ संप्टेंबर रोजी सकाळी सव्वा दहा वाजता डेक्कन इंग्लिश मिडियम स्कूल बाबूराव नगर , शिरुर येथे शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार असून यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून माजी प्राचार्य डॉ . आर . एस . जैन , बोरा कॉलेज मधील भूगोल विभागाचे माजी प्रमुख प्रा. चंद्रकांत साहेबराव धापटे , माजी मुख्याध्यापक व्ही .डी . कुलकर्णी , डेक्कन स्कूल शिरुरचे मुख्याध्यापक समीर ओंकार आदी उपस्थित राहणार असून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन हलवाई चौक गणेश मित्रमंडळ शिरुरचा वतीने करण्यात आले आहे . यापुर्वी प्रेरणादायी शिक्षक पुरस्कराने राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक दत्तात्रेय वारे , डॉ . प्रा .राजेराम घावटे , प्राचार्य डॉ . द्वारकादास बाहेती ,प्रा. चंद्रकांत धापटे , प्रा .डॉ .क्रांती गोसावी( पैठणकर ) , प्रा .अलका बेलोटे , प्राचार्य डॉ .अमोल शहा , प्राचार्य डॉ .समीर ओंकार ,प्रा . विलास आंबेकर , दादासाहेब गवारी, क्रीडाशिक्षक नारायण काळे , प्रा . प्रसाद शिंदे , शिक्षीका अनिता भोगावडे , विद्या वाघमारे ( सोळसे ) ,मुख्याध्यापिका स्वाती थोरात , प्रा . डॉ . ज्योती धोत्रे, मुख्याध्यापक विनायक म्हसवडे, ग्रंथपाल प्रताप भोईटे, सीमा आगरवाल यांना सन्मानित करण्यात आले आहे .