सेनगांव तालुक्यातील सवना येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते विजय वानखेडे हे सतत सेनगाव तालुक्यातील शेतकरी बांधव शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी सतत निवेदन व पाठपुरावा तसेच आंदोलन करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात तालुक्यातील राशींचा प्रश्न असो रोडचा प्रश्न असो शेतकरी बांधवांच्या समस्या असो यासाठी ते नेहमीच धडपड करत असतात तसेच मौजे सवना येथील शाळेतील रिक्त असलेल्या शिक्षकांच्या पदासाठी तसेच शाळेच्या इमारत बांधकामासाठी व शाळेतील विद्यार्थ्यांना शौचालय बांधून उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी वेळोवेळी निवेदने आंदोलने तसेच पाठपुरावा केला त्यामुळे सवना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शौचालयाचे काम मंजूर झाले आहे असे एका पत्राद्वारे त्यांना उपमुख्य अधिकारी पा.व.स्व. यांनी कळविले आहे तसेच शाळेच्या इमारती संदर्भात शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांनी पत्र देऊन इमारतीच्या तीन खोल्या मंजूर होणार असल्याबाबत पत्राद्वारे कळवले आहे तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी सवना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विजय वानखेडे यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे तसेच उपाध्यक्षपदी दिनेश राव नाईक तर शिक्षण तज्ञ पदी माझी शिक्षक दिगंबरराव नायक यांची निवड व सर्व सदस्यांची निवड करण्यात आली आहे यावेळी शाळेतील मुख्याध्यापक मोरे सर, देवळे सर, नायक सर, शाळेतील शिक्षण गुरुजन वर्ग तसेच माजी शिक्षक विलासरावजी सरनाईक व सर्व पालक वर्ग मोठ्या संख्येने या निवड प्रसंगी उपस्थित होते व परिसरासह गावातून विजय वानखेडे अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर करण्यात येत असल्याची माहिती सवना गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं