शाळेचा विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करत केला वाढदिवस साजरा..

श्रीनाथ हायस्कूल पैठण च्या वतीने व्यक्त केले आभार....

पैठण प्रतिनिधी:- आज दि.१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन व अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जगभर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत आहे.याच आंनदात आज बिडकिन येथील नामांकित सुर्या इंडियन गॅस एजन्सी चे मालक वैजनाथ डंप्पलवार यांचा वाढदिवस.

आज वाढदिवस निमित्ताने कुठल्याही प्रकारची इतर खर्च न करता श्रीनाथ हायस्कूल,पैठण येथील शालेय अंदाजे 51 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करत आपला वाढदिवस साजरा केला आहे.यावेळी डंप्पलवार यांना सर्व शालेय विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी ओम भगवंता बारड,सनी रविंद्र बिल्लाडे, सुनिल गायकवाड आदींसह श्रीनाथ हायस्कूल पैठण चे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक व विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती..