शिरूर दिनांक ( वार्ताहर) एस टी च्या प्रवासा दरम्यान महिला प्रवाश्याचा पर्स मधील सहा तोळे सोन्याचे तीन लाख रु किमंतीचे दागिने चोरट्याने चोरुन नेले आहेत . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार नानासाहेब उर्फ भाउसाहेब शिवराम ज-हाड वय 60 वर्षे धंदा शेती, रा. दसरेनगर, रूम नं. 11 वसंत टेकड़ी पाईपलाईन रोड अहमदनगर यांनी अज्ञात चोरटा विरोधात फिर्याद दिली आहे . दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी सडेबारा ते 1च्या चे दरम्यान एस. टी. बस मधुन नानासाहेब ज-हाड व त्याच्या पत्नी प्रवास करीत असताना तुळापुर फाटा ते शिरूर बायपास रिलायन्स पेट्रोलपंप जवळ प्रवासादरम्याण कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या पत्नीने पर्समध्ये ठेवलेली तीन तोळयाची मोहनमाळ ,३ तोळे वजनचे गंठण असे सहा तोळे सोन्याचे ३ लाख रु . किमंतीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३१ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत .