शिरूर दिनांक ( वार्ताहर ) टेम्पोचा टायर फूटून झालेल्या अपघातात परशुराम मारुती चव्हाण वय -६६ रा उरळगाव , ता . शिरुर जि पुणे हे ज्येष्ठ नागरिक डोक्यास मार लागून मृत्युमुखी पडले तर दोन जण जखमी झाले . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सौ.अनिता प्रविण चव्हाण वय 33 वर्ष रा. उरळगाव ता. शिरुर जि. पुणे यांनी अशोक लेलंड टेम्पो क्रमांक एम. एच 12 व्ही. टी 8895 वरील अनोळखी चालका विरोधात फिर्याद दिली आहे . दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास उरळगाव ता. शिरुर जि. पुणे गावचे हद्दीत अनिता चव्हाण व त्यांची सासु मनोरमा चव्हाण उरळगाव फाटा येथे अशोक लेलंड टेम्पो क्रमांक एम. एच. 12 - व्ही.टी 8895 या टेम्पोच्या केबीनमध्ये व टेम्पोचे पाठीमागील हौद्यात भरलेल्या खडीच्या कचवर बसून सासरे परशुराम चव्हाण असे तीन जण न्हावरेला बँकेच्या कामासाठी जात असताना अनोळखी टेम्पो चालक याने त्याचे ताब्यातील टेम्पो हा हयगयीने व निष्काळजी पणे भरधाव वेगात चालवुन तसेच रस्त्याचे नियमांकडे दुर्लक्ष करून कोळपेवस्ती येथील उताराला रोडला जोरात चालवल्याने टेम्पोचे टायर फुटून टेम्पो तीन वेळा पलटी झाला . यात टेम्पोत पाठीमागे बसलेले परशुराम मारुती चव्हाण वय 66 वर्ष यांचे डोक्यास गंभीर दुखापात होवून ते मरण पावले . तर मनोरमा परशुराम चव्हाण वय 65 वर्ष व अनिता चव्हाण जखमी झाल्या . अशोक लेलंड टेम्पो क्रमांक एम. एच 12 व्ही. टी 8895 वरील अनोळखी चालकाविरुद्ध अनिता चव्हण यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आधिक तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शेळके करीत आहे .