वारंगा फाटा येथे लोकशाहीर साहित्य सम्राट डॉ. अण्णा भाऊ साठे यांची १०४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती
निमित्ताने लहुजी शक्ती सेना शाखेचे उदघाटन करण्यात आले या वेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष संदेश शिखरे, मातंग ॠषी मंदिर येळेगांव तु .शिवाजी महाराज गजभारे, आर पी आय मराठवाडा संघटक दत्तराव गायकवाड, लहुजी शक्ती सेनेचे कळमनुरी ता. अध्यक्ष केशव लांडगे, युवक जिल्हाध्यक्ष चेतन पाटोळे,जिल्हा संघटक संतोष साठे,कळमनुरी उप तालुका अध्यक्ष विशाल गायकवाड, युवक तालुका अध्यक्ष हिंगोली अनिल ढोके, शाखा अध्यक्ष मारोती साठे, शाखा उपाध्यक्ष संजय सोनटक्के,शाखा सचिव उत्तम सोनटक्के,शाखा सहसचिव अजय सोनटक्के,कार्यध्यक्ष विनोद गजभारे, शाखा सल्लागार अक्षय गजभारे, शाखा संघटक अविनाश पवार व मोठ्या प्रमाणात महिला मंडळ यांच्या सह मातंग समाज बांधव उपस्थित होते