शिरूर दिनांक (वार्ताहर ) 29 ऑगस्ट 2024 रोजी शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय या ठिकाणी शिरूर शहरातील सर्व नव्याने नोंदणी करणाऱ्या मतदारांकरिता तसेच नाव दुरुस्ती करिता मतदार नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी स्मिता प्रदीप काळे यांनी दिली . सदर कॅम्पच्या माध्यमातून नागरिकांनी मतदान नोंदणीचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी काळे यांनी केले आहे .