गेवराई | प्रतिनिधी.

दि.१७ गेवराई तालुका साठेवाडी येथील तीस वर्षाची परंपरा असणारा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाची आध्यात्मिक परंपरा साठेवाडी करांनी अविरतपणे जोपासली तर यावर्षीही सुध्दा प्रतिवर्षाप्रमाणे वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाचे.आयोजन करण्यात आले बीड जिल्ह्यायाची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायण गडाचे मठाधिपती महंत.गु ह.भ.प.शिवाजी बाबा यांच्या आशिर्वादाने तर संत तुकाराम महाराज संस्थान मादळमोहीचे मठाधिपती..ह.भ.प. संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली.. सप्ताह पार पडला या कार्यात साठेवाडी च्या सर्व ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला!

याबाबत असे की कोळगाव पासून काही अंतरावर असलेले गाव साठेवाडी गावकऱ्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे साठेवाडी येथील वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह वर्ष तीसावे. या कार्यक्रमाचे आयोजन आठ सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्याची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायण गड येथील मठाधिपती परमपूज्य गुरुवर्य महंत शिवाजी बाबा यांच्या आशीर्वादाने तर श्रीक्षेत्र संत तुकाराम महाराज संस्थान मादळमोही येथील मठाधिपती हरिभक्त परायण संभाजी बाबा यांच्या परम आशीर्वादाने येथील सप्ताहाची सुरुवात करण्यात आली होती दरम्यानच्या काळात साठेवाडी ग्रामस्थांनी विविध संत महंताची कीर्तन सेवा आयोजित केली होती. मठाधिपती ह.भ.प. संभाजी महाराज. गणेश महाराज शास्त्री. साठेवाडीकर ह भ प अक्रूर महाराज साखरे. ह भ प दत्ता महाराज गिरी. गोरक्षनाथ संस्थान कुंभेजळगाव ह भ प कमलाकर बाबा गाडे जळगाव ह भ प ज्ञानेश्वर महाराज तांबे नेवासा इत्यादी महतांची कीर्तन सेवा साठेवाडी येथील अखंड सेवा निर्विवाद पार पाडत सर्वांनी शिवाजी बाबांना सन्मानित केले