शिरुर दिनांक् - पुणे  नगर महामार्गावर फलके मळा जवळ दोन मोटार सायकलचा अपघातात संदीप नामदेव गाडीलकर वय 35 राहणार शिंदोडी तालुका शिरूर जिल्हा पुणे हा मृत्युमुखी पडला तर एक जण गंभीर जखमी आहे . यासंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल बाळू गाडीलकर वय २४वर्ष व्यवसाय शेती राहणार शिंदोडी तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी मोटर सायकल नंबर एम एच 42 ए.एम. 92 85 वरील अज्ञात चालका विरोधात फिर्याद दिली आहे . दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी पुणे नगर महामार्गावरील फलके मळा कारेगाव येथील फलके मळा चौकात मोटरसायकल नंबर एम.एच .४२ ए .एम .9285 वरील अज्ञात चालक याने रस्त्याचे नियमाकडे दुर्लक्ष करून कोणताही इशारा न देता तसेच हायवे रोडवरील वाहनांना प्राधान्य न देता त्याच्या ताब्यातील मोटरसायकल ही पुणे ते नगर जाणारे रस्त्यावर रस्ता ओलांडून कर्डेलवाडी कडे जाणे करता अचानक घेतल्याने पुणे बाजू कडून येणारी मोटरसायकल नंबर एम .एच. -१२ आर. सी .2263 याचा अपघात होऊन संदीप नामदेव गाडीलकर वय 35 राहणार शिंदोडी तालुका शिरूर जिल्हा पुणे हे मृत्युमुखी पडले तर संदिप गाडीलकर याची मोटर सायकल चालवणारा दत्तात्रय धुमाळ याचे डोक्यात हात पायास लहान-मोठ्या गंभीर दुखापती झाल्या आहेत. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर थोरात करीत आहेत .