शिरुर दिनांक  ( वार्ताहर ) जिल्हा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय बुध्दिबळ स्पर्धा कारेश्वर शिक्षण संस्था येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत तालुक्यातील ५० शाळांचे जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. या स्पर्धा मुले व मुलींच्या १४ वर्ष, १७ वर्ष व १९ वर्ष अशा तीन वयोगटातून खेळवल्या गेल्या. तालुकास्तरीय बुध्दिबळ स्पर्धेत प्रशालेच्या एकूण १९ विद्यार्थ्यांनी विविध गटातून आपला सहभाग नोंदवला. त्यापैकी पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झालेली आहे. १४ वर्ष वयोगटातून ऋग्वेद मांडगे,१७ वर्ष वयोगटातून ईश्वरी खेसे तर १९ वर्ष वयोगटातून मानसी वीर, संस्कृती जगताप व रेहान मुल्ला अशा एकूण पाच विद्यार्थ्यांनी तालुका पातळीवर सुवर्णपदक व रौप्यपदकांची कमाई करत जिल्हा पातळीवर झेप घेतली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा अध्यापक सचिन रासकर, भाऊ करंजुले, दीपक गुजर, पूनम पवार यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक अध्यापकांचे संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा, शालेय समिती अध्यक्ष धरमचंद फुलफगर, सचिव प्राचार्य नंदकुमार निकम, प्रशालेचे प्राचार्य गुरुदत्त पाचर्णे, पर्यवेक्षक मच्छिंद्र बनकर, चंद्रकांत देवीकर, दिगंबर नाईक तसेच पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संभाजी महाराज दरोडे व सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.