शिरुर दिनांक ( वार्ताहर) भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण देशभर हर घर तिरंगा अभियान राबविले जात असून शिरूर नगरपरिषद मार्फत भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या जीवाचे रान केले ते स्वातंत्र्य सैनिक आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी देशाला समर्पित केले असे सैनिक व माजी सैनिक याचा शिरूर नगर परिषदेच्या वतीने सन्मान आणि सत्कार करण्यात आला . सदर कार्यक्रमासाठी शिरूर शहरातील व आसपासचे आजी व माजी सैनिक यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये कॅप्टन प्रभाकर बाबुराव थेऊरकर, कॅप्टन विश्वनाथ गोविंद माडगे, कॅप्टन जयवंत किसन कटके, लक्ष्मण जगदाळे, राज गोपाळ, श्रीमती शीतल दत्ता कांडेकर, रामदास आबासाहेब दळवी, शरद रंगनाथ शिंदे, श्रीमती शोभा गोपीनाथ नवले, जयसिंग ढवळे आदि आजी माजी सैनिक यांना सन्मानित करण्यात आले . यावेळी माजी सैनिकांनी आपल्या सेवा काळातील सन 1971 ची लढाई तसेच कारगिल युद्ध मधील अनुभव सांगितले . यावेळी शिरूर नगरपरिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी स्मिता काळे , प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ सहाय्यक कर निरीक्षक रामचंद्र नरवडे, संगणक अभियंता रत्नदीप पालके, लेखाधिकारी पंकज माने, लेखापाल मोहन गुरव, कर निरीक्षक अक्षय बनगिनवार, रचना सहायक पंकज काकड, आस्थापना प्रमुख विठ्ठल साळुंके, पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, चंद्रकांत पठारे, अमृत भवर, . प्रमोद पवार, . विनोद उबाळे, . भगवान दळवी, उपेंद्र पोटे, भूषण कडेकर, महेश गावडे आदी उपस्थित होते. भूषण कडेकर यांनी आभार मानले .