केंद्रीय आदिवासी मंत्री रेणुका सिंह या शिरूर लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आल्या होत्या, यानिमित्त भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव व युवा मोर्चाच्या वतीने वाघोली येथे आयोजित शिरूर लोकसभा प्रवास योजना कार्यक्रमांत रेणुका सिंह बोलत होत्या, यावेळी डॉक्टर ,सीए, वकील, बिल्डर,उद्योजक, प्रवचनकार,कीर्तनकार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला या वर्गाच्या समस्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन सिंह यांनी दिले. संपूर्ण शिरूर लोकसभा प्रवास योजनेतील वाघोलीतील कार्यक्रम सर्वोत्तम कार्यक्रम व नियोजन असल्याचे गौरवउद्गार यावेळी सिंह यांनी काढले.
याप्रसंगी आमदार माधुरी मिसाळ,भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा उपाध्यक्ष दादासाहेब सातव, प्रदीप कंद, धर्मेंद्र खांडरे,जालिंदर कामठे, संदीप भोंडवे, अनिल सातव,केतन जाधव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते