शिरूर दिनांक (वार्ताहर ) शिरुर शहरातील जुन्या पिढीतील क्रिकेट खेळाडूंना त्यांच्या क्रिकेट मधील योगदानाबद्दल देण्यात येणारा क्रिकेट जीवन गौरव पुरस्कार यावर्षी नोटरी किरण बापूराव आंबेकर यांना देण्यात आला. रायजिंग स्टार क्रिकेट क्लब शिरुरचा पाचवा वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार देण्यात आला . त्याच बरोबर वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले . त्यात 33 जणांनी रक्तदान केले . त्याच बरोबर मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . त्याच बरोबर रायजिंग स्टार कप एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यात शिरूर शहरातील 8 संघ सहभागी झाले होते स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज - राहुल गोगडे ,उत्कृष्ट गोलंदाज - डॉ प्रविण निरवणे ,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - कमलेश दरेकर ठरले . प्रथम पारितोषिक - साईराम क्रिकेट क्लब द्वितीय पारितोषिक - रायजिंग स्टार क्रिकेट क्लब यांनी मिळविले . रायजिंग स्टार क्रिकेट क्लबचे संस्थापक व कर्णधार डॉ . प्रवीण गायकवाड असून प्रशांत शेटे ,सुरेश फरगडे असलम भाई सय्यद,अक्षय मुळे,अविनाश बोरावडे ,बाजीराव कर्डिले ,डॉ. प्रवीण निरवणे डॉ. संदीप बच्छाव डॉ .प्रवीण चोळके जितेंद्र मांढरे प्रशांत ठुबे संताजी भोसले , अनिल उमक , ,निलेश धांडे , विजयकुमार , शिवरंजन फुंदे सिद्धार्थ चाबुकस्वार , सार्थक टेकुडे , निखिल भोसले , शिवा गाडे, रोहित परदेशी, आहेत

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |