शिरूर दिनांक (वार्ताहर) मराठा आरक्षण क्रांती योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे मोठ्या उत्सहात पुणे जिल्ह्यातील शिरूर मध्ये स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयजयकारात व ‘ एक मराठा लाख मराठा ‘ च्या जयघोषात जरांगे व त्याच्या समवेत असणारे आंदोलनकर्ते यांचे सतरा कमानीचा पुलाजवळ मोठ्या उत्सहात स्वागत करण्यात आले. जरांगे येत असलेल्या मार्गावर भगवे झेंडे लावण्यात आले होते. सतरा कमानी जवळ भव्य असा हार क्रेन मधून जरांगे यांना घालण्यात आला. दुपारी सुपा.ता. पारनेर जि. अहमदनगर येथून निघालेले आंदोलनकर्ते पूर्व निर्धारित वेळेनुसार सायंकाळी पाचचा सुमारास शिरूर शहरात येणे अपेक्षित असताना तब्बल ५ तास उशिराने शहरात दाखल झाले. जरांगे यांच्या समवेत असणा-या आंदोलनकर्त्यांची ठिकठीकाणी जेवणाची चहाची व अल्पोहाराची व्यवस्था मराठा समाज बांधव व विविध संस्था संघटना यांच्या वतीने करण्यात आली होती. सतरा कमानीचाजवळ आमदार ॲड. अशोक पवार ही उपस्थित होते . मुंबई येथे जाण्यासाठी आंदोलनकर्ते हे आपआपल्या वाहनातून दाखल झाले असून सुमारे २० कि. मी हून अधिक कि. मी वाहनांची रांग लागली होती. सुमारे २० हजार हून अधिक आंदोलन कर्त्यांना शिरूरकर शहर व पंचक्रोशीतील बांधवांनी मसालेभात ,बुंदी, चपाती, शेंगदाणा चटणी , चहा, बिस्किटे, केळी , पाण्याचे बाटली आदीचे वाटप केले. त्याखेरीज ठिकठीकाणी पिण्याचा पाण्याचे टकर उपब्लध करून देण्यात आले होते. आंदोलनकर्त्याच्या वाहनाचा ताफा आंदोलनकर्ते हे शिरूर बायपास रस्त्याने रांजणगाव गणपती कडे मार्गस्थ झाले. दरम्यान जरांगे यांचे बो-हाडे मळा, न्हावरा फाटा, सरदवाडी, फलकेमळा कारेगाव याठिकाणी ही भव्य असे स्वागत करण्यात आले.