संत एकनाथ प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चितेगाव  येथे भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा विद्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिन मोठ्या थाटामाटात व उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी पैठण तालुका ग्रामीण विकास शिक्षण संस्था पैठण या संस्थेचे सचिव मा.श्री.गणेशराव पा. वाघचौरे साहेब हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गावातील प्रथम नागरिक चितेगावचे सरपंच श्री.वाहेद भाई शेख हे होते. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ध्वज पूजन व ध्वजारोहण श्री गणेशराव पाटील वाघचौरे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी सौ.वाघचौरे मॅडम , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.ज्ञानदेव शिंदे सर, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक श्री शिवाजी भादे सर, गावचे उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामसेवक, तलाठी, विविध बँकेचे शाखाधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षक ,शिक्षिका व माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षिका, सर्व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या दिनाप्रसंगी विद्यालयात दिनांक 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .तसेच ध्वजारोहणानंतर देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री.आव्हाड सर, शेवटी आभार श्री.गोर्डे सर यांनी मानले.