AISF वैद्यकीय समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या 2022 या वर्षीच्या आदर्श महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्रधान करण्यात आले असून यामध्ये तीन पुरस्कार हे फुलंब्री तालुक्याच्या वाट्याला गेले असून यात दोन आदर्श पत्रकात पुरस्कार असून एक आदर्श व्यक्तिमत्त्व पुरस्काराचा समावेश आहे.

राज्यभरात विशेष कामगिरी करणाऱ्या लोकांना शोधून त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या सन्मान करण्याचे काम AISF वैद्यकीय समिती च्या माध्यमातून करण्यात येते, काल दि 14 रोजी मराठवाड्यातील अश्यायाच कर्तृत्वाचा सन्मान सोहळा खुलताबाद येथील भक्त निवासाच्या सभागृहात पार पडला.यावेळी aisf समितीचे राज्यध्यक्ष डॉ अमोल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आशाताई गजरे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार चे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे,समाजसेवक जितेंद्र भावे,साई महाशब्दे यांची उपस्थिती होती.

यावेळी लेखक,मुख्याध्यापक,आरोग्य कर्मचारी,प्राचार्य,डॉक्टर,परिचारिका,पत्रकार,समाजसेवक,आदर्श व्यक्तिमत्त्व असलेले अशा विविध क्षेत्रात उतूग भरारी घेऊन निष्टे ने काम करणाऱ्या महिला व पुरुषाचा सन्मान करण्यात आला,यामध्ये फुलंब्री तालुक्यातील ain news चॅनलचे पत्रकार महावीर जैस्वाल व दिव्यमराठीचे पत्रकार पंढरीनाथ काळे यांनी सामाजिक, राजकीय,तळागाळातील समस्या आपल्या लेखणीतून शासना समोर आणून देत त्याचा प्रश्न सोडवण्याचा काम अविरत पणे करत असून,त्याचा या कार्याचा गौरव व्हावा यानुष्यघाणे त्यांना AISF 2022 चा महाराष्ट्र राज्य आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला असून,पिरबावडा येथील समाजसेवक व राजू खेरणार यांनी समाजसेवा करत गावातील व परिसरातील अनेक समस्या सोडवण्यासाठी सरळ राजकीय नेत्यांशी भीडत आपली लढाई सुरू ठेवली आशा कर्तृत्वामुळे त्यांना आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार जाहीर झाला असून खुलताबाद येथे पुरस्कार वितरण समारंभात त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले असून फुलंब्री तालुक्यातून या तिघांनी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.