🔷 बिडकिन ते फुलंब्री १४ स्मार्ट बसेस सुरू...
🔷आता अवघ्या २० मिनिटात स्मार्ट बस सेवा उपलब्ध...
🔷बिडकिन करांनी केला वाहतूक विभागाच्या
अधिकारी,चालक,वाहतुक नियंत्रक यांचा सत्कार....
🔷नागरिकांची मोठ्या प्रमाणावर असलेल्या बस वाहतूकीचा प्रश्न सुटला...
बिडकिन प्रतिनिधी:-
आज दि.१५ ऑगस्ट रोजी
७५ व्या स्वातंत्र्य दिन व अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सुरु करण्यात आलेल्या स्मार्ट बस सेवा बिडकिन ते फुलंब्री यातील पहिली स्मार्ट बस बिडकिन बसस्थानक येथे दाखल झाली असता यावेळी फुलंब्री ते बिडकिन येथे आलेल्या पहिल्या स्मार्ट बस चे चालक आणि वाहक व वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवर ग्रामपंचायत सदस्य मधुकर दादा सोकटकर, गोरख चव्हाण, युवासेना जिल्हा प्रमुख काकासाहेब पाटिल टेके,राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तमिजोद्दीन ईनामदार,
शहर वाहतुक शाखा विभागीय अधिकारी राठोड साहेब, बिडकिन बस वाहतूक नियंत्रक सोनवणे साहेब,सुनील सेट धूत, देविदास चव्हाण,समद अत्तार,अस्लम सय्यद , राहुल ठानगे,आकाश वंजारे, शैलेश काळे,सुरेश निनाले, हिवाळे भाऊ, सुदांम आपशिंदे,अयुब शेख, अर्शद शेख, मोहसिन शेख, राजु शेख आदींसह बिडकिन व परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.