भुमका,युवक मार्फत आदिवासी नृत्य.चिखलदरा - तालुक्यातील दहेंद्री गावातील दहेंद्री ढाणा येथील अतिसाराची लागण चौथ्या दिवशी आटोक्यात आली असून आरोग्य विभागामार्फत आरोग्य पथकातून घरोघरी आरोग्य कर्मचारी मार्फत सर्व्हेक्षण करून जलजन्य आजरा विषयी जनजागृती करण्यात आली. गावातील सरपंच गावकरी, गावातील युवक मंडळी भुमका, पडियार तसेच आरोग्य कर्मचारी बी. एम.सरदार यांनी लोकनाट्य द्वारे गावातील लोकांना कोरकू या स्थानिक जनजातीय भाषेमध्ये आरोग्य शिक्षण द्वारे भव्य प्रमाणात जनजागृती करून मार्गदर्शन करण्यात आले.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

  

जलजन्य साथरोग नियंत्रण व शुद्ध पाणी पूर्ण पुरवठा प्रतिबंधात्मक उपाययोजनेतर्गत शुद्ध पाणी पिण्याचे महत्व व अशुद्ध पाणी पिल्याने होणारे आजार याबाबत लोकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रथम पाणी उकळून थंड करून द्विपदरी कपडाने गाळून घेऊन पिण्याच्या भांड्यामध्ये भरणे आणी त्यानंतर सदर पाण्यामध्ये मेडिक्लोर किंवा तुरटी किंवा जीवन ड्राप चा उपयोग करणे बाबत लोकांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी सरपंच रवी बेठेकर वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश अलोकर, डॉ. स्वाती राठोर, डॉ.अमित पातोंड, डॉ. अजय ठोसरे, डॉ. पंकज माहुलकर डॉ. अंकुश देशमुख,डॉ सागर कोगदे, डॉ. अंकित राठोर,दिनेश बैंगणे, नितीन बाळे, बी. एम सरदार, नंदूकिशोर ढोकणे, दिलीप अलोकर, एकनाथ चोरपगार, प्रज्ञा सिरसाट,सध्या चांदुरकर,संगीता चव्हाण,अर्चना नांदूरकर,संगीता पाटणकर,मालती कवडे ,लता अलोकर सुरेश मेहड,मंगेश चव्हाण, ज्ञानेश्वर अलोकर,अमित मुंडे, संतोष रेचे गावातील युवकांनी आदींनी परिश्रम घेतले.