शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरूर कृषि उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्रीसाठी येणार्‍या शेतक-यांना येत असणा-या समस्यांचा संदर्भात बाजार समितीचा आवारात सोमवार दिनांक 5 ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता शेतक-यांची भेट घेवून चर्चा करणार असल्याची माहिती भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय शिवाजी पाचंगे यांनी दिली . ते म्हणाले काही दिवसापासून सातत्याने तक्रारी येत आहेत की तेथे शेतक-यांना जाणिवपुर्वक त्रास दिला जात आहे. भाजीपाला शेतक-यांच्याकडुन कोणतेही उत्पन्न मिळत नाही म्हणून जाणिवपुर्वक शेतक-यांना त्रास तर दिला जात नाही ना असा प्रश्न उपस्थित करुन शिरूर बाजार समिती ला जर भाजीपाला शेतक-यांच्या समस्या सोडविण्यात स्वारस्य नसेल तर बाजार समिती च्या बाहेर बाजार भरविण्यासाठी शेतक-यांना परवानगी द्यावी असे ते म्हणाले .शेतक -यांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवार दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांची भेट घेऊन समस्या संदर्भात चर्चा करणार आहे. बाजार समितीचे प्रभारी आणि प्रभारी सचिव यांनीही सोमवारी कार्यालयात उपस्थित रहावे . त्या दिवशी बाजार समीती प्रशासनाने भाजीपाला शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण केले नाही तर त्याच दिवशी बाजार समितीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा ही पाचंगे यांनी दिला आहे .