वाढदिवसाचा खर्च टाळुन कासारीतील अनाथाश्रमाला मदत
आकाश भोरडे
तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर नामदेव थिगळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त होणारा अनाठायी खर्च टाळुन अनाथाश्रमाला मदत करत वाढदिवस साजरा केला.
कासारी(ता.शिरूर) येथील निमगाव म्हाळुंगी रस्त्यालगत असणाऱ्या गुरुकुल वसतीगृहातील गरिब निराधार उसतोड कामगार, विटभट्टी मजुर व भटक्या विमुक्त समाजातील अनेक निराधार मुले आहेत.त्यामुळे या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी अन्नधान्य किट देण्यात आले तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापुन खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंदे, मनसे शिरूर-हवेली तालुकाध्यक्ष तेजस यादव ,उपजिल्हाधक्ष किरण गव्हाणे,ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पवार, बाळासाहेब चव्हाण, संतोष कुसाळे, सचिन यादव,सागर कंक, किरण घोलप, चंद्रकांत शेलार,श्रीनाथ लोंढे, सचिन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.