शिरुर दिनांक ( वार्ताहर ) घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा राजकारणाचा अड्डा नाही असे म्हणत घोडगंगा सहकारी साखर कारखाना तोट्यात गेला कसा असा सवाल घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक दादापाटील फराटे यांनी उपस्थित केला .

  शिरुर येथे बातमीदारांसमवेत बोलत असताना ते म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीकरीता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे मागितली आहे . उमेदवारी मिळाल्यास निवडणूक ताकदीने लढविल व घोडगंगा सहकारी साखर चालू करण्याबाबत प्राधान्य राहील असे फराटे म्हणाले . दरम्यान राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार ॲड .अशोक पवार यांच्या कडून सांगण्यात येते की आपण अजितदादा पवार गटात न गेल्याने कारखान्याचा कर्जाचा संदर्भातील निर्णय होत नाही . हा अजितदादा पवार यांच्यावर करण्यात येत असलेल्या आरोप खोटा आहे . कर्ज प्रस्ताव हा वेळेत सादर करावा लागतो व त्यात काही त्रृटी असतील तर वेळेत त्रृटी दुरुस्त करुन प्रस्ताव सादर करावा लागतो . कर्ज तोंड पाहून नाही तर व्यवहार व फाईल पाहून दिले जाते . त्रृटी दूर करायचा नाहीत व आरोप करायचे हे बरोबर नाही असे फराटे म्हणाले . २५ वर्ष कारखान्याची एकहाती सत्ता असताना व उसाचे मोठे क्षेत्र कारखाना कार्यक्षेत्रात असतानाही घोडगंगा कारखाना अडचणीत का असा सवाल फराटे यांनी उपस्थित केला . खाजगी साखर कारखानावर निष्ठा व सहकारी कारखान्यांशी गद्दारी असे नको असे ही फराटे म्हणाले . शिरुर तालुक्यातील विविध विकासकामे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मार्गी लावली आहेत . दादांच्या विचारांना माननारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिरुर मध्ये असल्याने दादांचा विचाराचा उमेदवार शिरुर मधून विजयी होईल असा विश्वास व्यक्त करीत घोडगंगा साखर कारखान्याचा आजच्या परिस्थितीचा अजितदादा पवार यांच्यावर ठपका ठेवू नका . घोडगंगाचा आजच्या परिस्थितीला ॲड. अशोक बापू पवार जबाबदार असल्याचे फराटे यांनी सांगितले .