शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर  मधील सर्व शासकिय कार्यालयातील विविध अधिकाऱ्यांचा कार्यालयाबाहेर त्यांच्या कामाचे स्वरुप त्यांचे कर्तव्य व शासन स्तरावर त्यांना मिळणारे मासिक वेतना या सर्वाचा फलक दर्शनी भागात लावणार असल्याचे आज भुमीपुत्र प्रतिष्ठाण चे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी सांगितले.

Sponsored

द मून रेस्टॉरेंट एवं देव क्लासेज - बूंदी

द मून रेस्टॉरेंट एवं देव क्लासेज की ओर से समस्त बूंदी वासियों को रूपचौदस, धनतेरस, दीपावली एवं गोवर्धन पूजा की हार्दिक बधाइयाँ व शुभकामनाएं

 "सरकारी काम अन बारा महिने थांब" अशी म्हण आपण सर्वत्र ऐकत असतो पण सरकारी अधिकारीच जर आपल्या कामावर ठाम नसतील तर सर्वसामान्य नागरिकांनी करायचे काय? हा प्रश्न उभा राहतो मग वैतागलेले नागरिक कामासाठी वेळप्रसंगी एजंट गाठतात आणी त्यांचे काम होते शासकीय कामातील हा सावळागोंधळ सर्वच ठिकाणी पहायला मिळतो मुख्य काम करणारा अधिकारी व सर्वसामान्य नागरीक यांच्यातील प्रत्यक्ष कामाचा संवाद शक्य नसला तरी या मधील दुवा साधत सर्वत्र जोरात एजंटगिरी चालते अशा परिस्थितीतुन सर्वच कार्यालयीन व्यवस्था जात असुन यासाठी ठोस उपाययोजना म्हणुन भूमिपुत्र प्रतिष्ठाणाच्या वतीने शिरुर मधील सर्व सरकारी कार्यालयाबाहेर संबधित अधिकारी यांचे प्रशासकीय सेवेतील कार्य त्यांचे कर्तव्य व शासनदरबारी मिळणारे वेतन या सर्व माहितीचा फलक लावणार असल्याचे सुशांत कुटे यांनी सांगितले शिरुरच्या तहसिल कार्यालयातील सर्व विभाग (पुरवठा,दुय्यम निबंधक,सहकारी संस्था,भूमिअभिलेख),नगरपरिषदेतील सर्व कार्यालये,पोलिस स्टेशन,नगरपरिषद कार्यालय,अनुदानित शिक्षण संस्था,पंचायत समिती मधील सर्व कार्यालय,सार्वजनिक बांधकाम विभाग,सरकारी रुग्णालये आदींसह सर्वसामान्यांच्या निगडीत असणारया सर्व कार्यालयात असा उपक्रम राबविणार असल्याचे कुटे यांनी सांगितले सर्वसामान्य नागरीकांना आपल्या कामासाठी होणारा मनस्ताप त्यासाठी कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे आणी अधिकार्यांना आपल्या कामाची जाणिव व्हावी या साठी हा उपक्रम राबविला जाणार आहे तरीही यातुन सर्वसामान्य नागरिकांचे काम झाले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला