अंबड येथे आज पासून इंदिरानगर झोपडपट्टीतील निराधार चार महिलांचे २१००० रुपयाच्या वार्षिक उत्पन्नासाठी अमरण उपोषण तर इंदिरानगर, महात्मा फुले नगर भिल्ल वस्ती पठाण मोहल्ला विकास नगर यांच्या नामांतरासाठी बेमुदत चक्री उपोषण.
निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विधवा, भूमीहिन, बेघर, अज्ञान मुले मुली असणाऱ्या निराधार महिलांचे तसेच मंडळ अधिकारी यांचा गृह चौकशी अहवाल असताना सुद्धा अंबड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सिनगारे यांचेकडून २१००० हजार रुपयाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र न मिळाल्याने बेमुदत अमरून उपोषण तर इंदिरानगर झोपडपट्टीतील हातावर पोट भरणाऱ्या गेले ४० वर्षापासून त पक्की घरी बांधून राहत असलेल्या घरांची व जमिनीचे आज पर्यंत शासनाच्या नियमाप्रमाणे सदर जागा व सदरील घरे नियमाकुल न झाल्याने याशिवाय अंबड नगरपरिषदेच्या रेकॉर्ड नमुना नंबर ४३ वर नोंदी घेऊन त्याच्या नकला न दिल्याने बेमुदत चक्री उपोषण याशिवाय पठाण मोहल्ला, भिल्ल वस्ती ,महात्मा फुले नगर ,विकास नगर, या ठिकाणी सुद्धा वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांच्या घराचे व जागेचे भूमि अभिलेख मार्फत सर्वे मोजणी करून त्याही जागा संबंधितांच्या नावे राजेश व कागदोपत्री करून देण्यात याव्या या मागण्यांसाठी आज दि. १४ ऑगस्ट सकाळी ११.०० वाजेपासून सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार यांच्या नेतृत्वाखाली संबंधित रहिवाशांचे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत बेमुदत चक्री उपोषण सुरू झाले आहे यादरम्यान उपोणकर्त्यांना काही मानसिक अथवा शारीरिक त्रास झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनावर तसेच संबंधित अधिकाऱ्यावर राहील अशी उपोषणकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दि.५ ऑगस्ट पासूनच अल्टिमेट देऊन आजपासून उपोषणास सुरुवात केली असून शासन व प्रशासनाकडून स्वातंत्र्याच्या या ७५ व्या सुवर्ण महोत्सवानिमित्त लोकशाही मार्गाने न्यायाची अपेक्षा केली आहे.