शिरूर दिनांक ( वार्ताहर ) येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर येथे आषाढी एकादशी निमित्त आयोजित दिंडी सोहळ्यामध्ये विश्व चषक विजेत्या भारतीय संघाचा सहभाग दाखवण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय संघाची जर्सी परिधान करून तसेच T-20 वर्ल्ड कप हातात घेऊन दिंडीत सहभाग घेतला.बाबुराव नगर परिसरात दिंडीचे आयोजन करण्यात आले. दिंडीमुळे परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. प्रशालेच्या प्रांगणात रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जनता सहकारी बँकेचे अधिकारी भाऊसाहेब बेंद्रे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक डॉ समीर ओंकार, स्थानिक सल्लागर समिती सदस्य सुधाकर पोटे, शिरूर एस टी आगाराचे निवृत्त व्यवस्थापक प्रदीप कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शाळेतील शिक्षिका सुनिता सरोदे व अश्विनी पिंगळे यांनी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले. सखाराम पुरी यांनी वारीची माहिती व आषाढी एकादशीची महती सांगितली.