शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर शहरातील रस्त्यांचा प्रश्नांवर शिरुर नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेचे आंदोलन बहुजन मुक्ति  पार्टी शिरुर यांच्या वतीने करण्यात आले . कोणी रस्ता देत का रस्ता ? या आशयाचे फ्लेक्स बोर्ड लावून बहुजन मुक्ती पार्टी शिरूर यांच्या वतीने शिरूर शहरातील संविधान चौकात शहरातील रस्त्याच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी अनोखे स्वाक्षरी मोहीम  आंदोलन करण्यात आले. याबाबत पालिकेस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिरूर नगरपरिषद हद्दीतील मंगलमुर्ती नगर, मदारी वस्ती आणि ढोमे वस्ती सर्वे नं.286-288 पाचर्णे मळा हिंगणीरोड येथील नागरिकांना जाण्या- येण्यासाठी रस्ताची अनेक वर्षांपासून अतिशय दयनिय अवस्था झालेली आहे .ढोमे वस्ती येथे तर रस्ताच नाही. त्याबाबत वेळोवेळी शिरूर नगरपरिषद यांच्या कडे रहिवाशांनी व अनेक सामाजिक संघटना यांनी रस्त्याची मागणी केलेली आहे . शिरूर नगरपरिषदने त्या रस्त्या बाबत आजतागायत कुठलीही दखल घेतलेली नाही. शिरूर नगरपरिषदेच्या वतीने कोट्यावधी रूपये खर्च करून अनेक विकासकामे हाती घेण्यात आले आहेत. परंतू ज्या ठिकाणी गरीब आणि सामान्य नागरिक राहतात त्याठिकाणी प्राधान्याने पायाभूत सुविधा जसे रस्ते, कॉक्रीटीकरण करणे गरजेचे आहे. त्याठिकाणी नगरपरिषद जाणिवपुर्वक सावत्र वागणूक देत आहे. वरील नमूद ठिकाणी रस्ता करण्यासाठी व या प्रश्नी लक्ष वेधून घेण्यासाठी व हक्काचा रस्ता मंगलमुर्ती नगर आणि मदारी वस्ती तसेच ढोमे वस्ती पाचर्णे मळा हिंगणीरोड येथील रहिवाशांना मिळावा असे निवेदनात म्हटले आहे . या आंदोलनात शहरातील असंख्य लोकांनी उपस्थित राहुन स्वाक्षरी करुन आपला सहभाग नोंदविला . यावेळी बहुजन मुक्ती पार्टी चे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष फिरोजभाई सय्यद, शिरूर शहराध्यक्ष समाधान लोंढे, शिरूर शहर सचिव सागर घोलप, शिरूर शहर संघटक अशोक गुळादे, प्रहार सैनिक संघटनेचे पदाधिकारी सुदर्शन शिर्के, भारतीय विद्यार्थी मोर्चा शिरूर तालुका अध्यक्ष सुलतान शेख,तसेच भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष संपत लोखंडे ,मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुबभाई सय्यद,मनसे शिरूर शहर सचिव रवी लेंडे,भारत मुक्ती मोर्चा चे विजय भोईरकर,आम आदमी पार्टीचे अनिल डांगे, अजिज खान, इस्माईल खान, तसेच असंख्य नागरिकांनी स्वाक्षरी करत या आंदोलनात सहभाग घेतला .