औरंगाबाद :- दि.१४(दीपक परेराव) महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते असंघटित कामगार सेनेच्या वतीने आज पहिल्या टप्प्यात १५० कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
जिल्ह्यातील कामगारांच्या प्रश्नांसाठी व विविध शासकीय योजनांची माहिती देण्याकरता शिवसेना असंघटित कामगार सेना काम करीत असून संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत जवळपास ११०० असंघटित कामगारांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे. विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच कामगार आयुक्त व उपायुक्त यांच्या सहकार्याने आज या सुरक्षा संचचे वाटप करण्यात आले. या सुरक्षा संच मध्ये कामगारांसाठी आवश्यक हेल्मेट, बूट, सेफ्टी बेल्ट, जॅकेट, बॅग, टॉर्च, मच्छरदाणी, जेवणाचा डबा, पाण्याची बॉटल या वस्तूंचा समावेश आहे.
यावेळी बोलताना विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे म्हणाले की कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय कामगार संघटना कटिबद्ध तर आहेच याच बरोबर असंघटित कामगारांचे प्रश्न मागे पडू नयेत त्यांना देखील न्याय मिळावा. यासाठीच असंघटित कामगार सेनेची स्थापना करण्यात आली आहे.सामान्य कामगारांना न्याय मिळवून देण्यास महत्त्वाची भूमिका ही सेना पार पाडते. यांच्या माध्यमातून गरजवंतांना याचा लाभ मिळालाच पाहिजे यापुढे देखील कामगारांना काही अडचणी असतील तर त्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आजपर्यंत जवळपास १५० असंघटित कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले असून या पुढे देखील हजारो असंघटित कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप लवकरच करण्यात येईल असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी बोलतांना दानवे यांनी दिले.
याप्रसंगी शहरप्रमुख बाळासाहेब थोरात प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाचे आयोजन व पुढाकार असंघटित कामगार सेनेचे शहराध्यक्ष सुनील शिंदे यांनी केले होते. तसेच याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष सुनीता भुजंग, सुनील निकम, अनिल खांबट, जावेद भाई, प्यारूभाई, संतोष देवरे, नानासाहेब खेडकर, दत्तू नागरे, अण्णा गायकवाड, सरपंच मच्छिंद्र राठोड यांची उपस्थिती होती.