औरंगाबाद :- शैलेंद्र खैरमोडे
औरंगाबाद ग्रामीण चे पोलिस अधीक्षक मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण हे सप्टेंबर/2019 ते सप्टेंबर/2021 या दरम्यान अपर पोलीस अधीक्षक म्हणुन गडचिरोली येथे कार्यरत होते.
दिनांक 18/10/2020 रोजी नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना महाराष्ट्र -छत्तीसगढ सिमेवर किसनेली गावाजवळ 60 ते 70 नक्षल असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने तत्कालिन अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री. मनिष कलवानिया, यांचेे नेतृत्वात सी-60 कमांडो पथकासह 15 किमी घनटाद जंगलात पायी जाऊन सर्च ऑपरेशन राबवित असतांना नक्षलांनी पोलीसांचे दिशेने जोरदार गोळीबार सुरू केल्याने तेथे प्रत्युतरात पोलीसांनीही गोळीबार सुरू केला. यावेळी मा. मनिष कलवानिया, यांचे सह त्यांचे सी-60 कमांडो पथकाने आपले प्राणाची बाजी लावुन नक्षल हल्ला परतावुन लावला. सदर ठिकाणी पोलीस आणि नक्षल यांची 8 तास भीषण चकमक चालली. यामध्ये पोलीसांचा वाढता दबाब पाहुन तेथून नक्षली पळुन गेले.
सदर ठिकाणाची पाहणी केली असता तेथे 05 जहाल नक्षलींचे मृतदेह तसेच मोठया प्रमाणावर शस्त्र, दारूगोळा,कुकर बॉम्ब, स्फोटके व ईतर नक्षली साहित्य ही मिळुन आले होते.
सदर अभियानामध्ये मा. मनिष कलवानिया, तत्कालिन अपर पोलीस अधीक्षक (अभियान) गडचिरोली. व सोबत त्यांचे सी-60 कमांडो पथकाने* यांनी टिपागड दलम, कोरची दलम,आणि प्लाटुन 15 मधील जहाल नक्षलवादीना टिपण्यात यश आले होते. सदर चकमकीमध्ये ठार झालेल्या नक्षलवादयावर 18 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.
सदर साहसी आणि नक्षल चळवळीला हादरा देणा-या शौर्यपूर्ण कामगिरी बाबत पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांना देशाचे *महामहिम राष्ट्रपती यांचे कडुन “शौर्य पदक” Gallantry Medal जाहिर करून सन्मानित करण्यात आले आहे.