शिरुर दिनांक ( वार्ताहर ) १६ कोटी ७० लाख ५४ हजार ३६१ रु . रक्कमेचा अपहार करून ठेवीदारांचा विश्वासघात केल्याप्रकरणी आनंद नागरी पतसंस्थेचे अभयकुमार चोरडिया यांचासह व्यवस्थापक व अन्य अश्या 14 लोकांचे विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी संजयकुमार सखाराम पुंडे , वय 56 वर्ष, व्यवसाय शासकीय नोकरी राहणार पुणे यांनी फिर्याद दिली आहे . दिनांक 31/12/2013 ते दि. 20/02/2020 या कालावधीमध्ये शिरुर, ता. शिरूर, जि. पुणे येथील आनंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेमध्ये 1) श्री. अभयकुमार पोपटलाल चोरडिया, संस्था अध्यक्ष / भागीदार 2) श्री. प्रविण चंपालाल चोरडीया, भागीदार 3) श्री. मुरसलीन वहिंद मोहमद, भागीदार 4) श्री. सनी धरमचंद चोरडीया, भागीदार 5) सौ. सविता अभयकुमार चोरडिया, भागीदार 6) सौ. सुजाता नितीन चोरडिया, भागीदार 7) सौ. प्रितम प्रविण चोरडिया, भागीदार 8) श्रीमती पारसबाई पोपटलाल चोरडीया, भागीदार १) श्री. चंपालाल बुधमल चोरडिया, भागीदार 10) श्री. सुरेंद्रकुमार रतनलाल चोरडिया, जामीनदार 11) श्री. शांताराम गंगाधर देवकर, संस्था व्यवस्थापक या व्यक्तींनी चाचणी लेखापरीक्षणानुसार संस्था कामकाजात निदर्शनास आलेल्या गंभीर बाबी, अपहार, अफरातफर, , अनियमितता करुन संस्था सभासदांचा व ठेवीदारांचा विश्वासघात व फसवणूक केली आहे. तसेच 12) श्रीमती सरिता ब्रिजमोहन सिंह, सनदी लेखापाल 13) श्री. नागेंद्र एच. सोरटे, प्रमाणित लेखापरीक्षक 14) श्री. अजय एच. सोरटे , प्रमाणित लेखापरीक्षक यांनी संगनमत करून वरील कालावधीत स्वंत :च्या फायदयाकरीता आपल्या पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवींची रक्कम ही स्वतःचे फायदयासाठी आपल्याच फर्मच्या नावे कर्जाचे वितरण करून ठेवीदारांच्या रु. 16,70,54,361/- (अक्षरी रुपये सोळा कोटी सत्तर लाख चोपन्न हजार तीनशे एकसष्ट फक्त) एवढ्या रक्कमेचा अपहार करून ठेवीदारांचा विश्वासघात केला आहे. म्हणुन वरील नमूद 14 लोकांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हाचा तपास पीएसआय मुजावर करीत आहेत .