शिरुर दिनांक ( वार्ताहर) ज्ञानोबा माउली तुकारामचा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरात वळती (ता. आंबेगाव) येथून निघालेल्या श्रीक्षेत्र थापलिंग पायी दिंडी सोहळ्याचे शिरुर येथे मोठ्या उत्सहात स्वागत करण्यात आले . श्रीक्षेत्र थापलिंग दिंडी सोहळ्याचे हे यंदाचे बारावे वर्ष आहे. वळती येथून निघालेली दिंडी रामलिंगहून शिरुर शहरात आली .

शिरुर गोलेगाव रोड वर शिक्षक नेते संतोष थोपटे व प्रा . किशोर थोपटे यांच्या परीवाराचा वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले . यावेळी थोपटे यांच्या निवासस्थानी दिंडी सोहळा नाष्टा साठी थांबला . इडली सांबार व शिराचा नाष्टा वारक-यांना देण्यात आला . दिंडी सोहळाचा वतीने संतोष थोपटे व किशोर थोपटे यांच्या सन्मान करण्यात आला . दिंडी सोहळा तर्डोबाचीवाडी, निमोणे, गुनाट, इनामगाव, देऊळगाव राजे, पळसदेव, इंदापूर, मार्गे पंढरपूरकडे जाणार आहे .