सोलापूर :- अक्कलकोट रोड येथील जमिनीचे बनावट बक्षीसपत्र तयार करून जमीन हडपल्या प्रकरणी सदर बजार पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल असलेल्या रामू तिपन्ना कोळी वय 40 वर्ष रा. सोलापूर याचा जामीन अर्ज मे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौ. खेडेकर मॅडम यांनी फेटाळला.

 यात हकीकत अशी की, सोलापूर महानगरपालिका हद्दीतील अक्कलकोट रोडवरील शेतजमीन यांसी क्षेत्रफळ 4 हे 17 आर ही फिर्यादी श्रीनिवास मोगलप्पा पोगुल यांना सन 1963 मध्ये वारसाहक्कांने वाटणीपत्राद्वारे मिळालेली आहे तेव्हापासून सदर मिळकत हि फिर्यादी हा कब्जे वहिवाटीतआहे. आरोपी रामु तिपण्ण कोळी, मोहन सत्यण्णा मादास, बलराम दत्तात्रय गुल्लीकोंडा यांनी संगनमत करून फिर्यादीचे मालकिची वर नमुद मिळकत ही सन 1988 साली बक्षीसपत्राद्वारे फिर्यादीने लिहून दिल्याचे भासवून सन 2019 मध्ये गावतलाठी अधिकारी ता.उत्तर सोलापूर यांचेशी संगनमत करून फिर्यादीचे मालकिचे 7/12 उताऱ्यावर आरोपीचे नावाची नोंद करून फिर्यादी चे मालकीची जमीन ही दुय्यम निबंधक कार्यालयाचे बनावट शिक्के तयार करून त्याद्वारे बनावट बक्षीसपत्र तयार करून गिळंकृत करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फिर्यादीने सदर बाजार पोलिस स्टेशन येते राम तिपण्णा कोळी,मोहन सत्यण्णा मादास,बलराम दत्तात्रय गुल्लीकोंडा यांचेविरूद्ध फिर्याद दाखल केली होती.

प्रस्तुत गुन्हायामध्ये आरोपी रामु तिपण्णा कोळी याने पोलीस कोठडीमध्ये पोलिसांसमक्ष बनावट व खोटे बक्षीसपत्र तयार करण्याकरिता शंकर सातलिंगप्पा म्हेत्रे रा.दुधनी तालुका अक्कलकोट जि सोलापूर त्याचा कामगार गंदीराम रा.अक्कलकोट यांनी तयार करून दिली आहे ते त्यांनी कसे तयार करून दिले हे मला माहीत नाही त्यांनी त्या जमिनीपैकी अर्धी जमीन माझ्या नावावर करून दे असे म्हटल्यानंतर मी त्यात तयार झालो व त्यांनी माझे नाव सातबारा उताऱ्यावर लावले असे तपास दरम्यान पोलिसांना सांगितलेले आहे.

यात आरोपीने जामिनाकरिता दाखल केलेला अर्ज मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी फेटाळला होता, त्यानंतर आरोपीने सोलापूर येथील मे. सत्र न्यायालयात जमीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जाचे सुनावणीत मुळ फिर्यादीतर्फे युक्तिवाद करताना अँड. संतोष न्हावकर यांनी आरोपीने 40 कोटी पेक्षा जास्त किंमत असलेली जागा बळकावण्याचा प्रयत्न केलेला असून भूसंपादनाची 61 लाखाची रक्कम सुध्दा हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले, सदरचा युक्तिवाद व सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून मे.न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.

यात मुळफिर्यादी तर्फे अँड.संतोष न्हावकर, अँड. वैष्णवी न्हावकर ,अँड.राहुल रुपनर,अँड.शैलेश पोटफोडे, अँड. मीरा पाटील यांनी सरकारपक्षातर्फे अँड.प्रकाश जन्नू यांनी तर आरोपीतर्फे अँड.प्रशांत नवगिरे यांनी काम पाहिले.